4000 वर्षांपूर्वी, मेसोपोटेमिया मध्ये परमेश्वराने अब्राहमला दर्शन दिले आणि त्याला म्हणाला, “देशाबाहेर जा, नातेवाईकांपासून दूर जा, बापाच्या घरापासून दूर मी दाखवीन त्या प्रदेशात जा, मी त्याचे एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. " अब्राहमने परमेश्वराची आज्ञा पाळली आणि तो समृद्ध कनान प्रदेशात येऊन आपला पुत्र इझाक आणि नातू जाकोब, ज्याचे नंतर नामकरण करण्यात आले "इस्राएल ", यांच्या सोबत राहू लागला.
पुढे कनान देशात देशात दुष्काळ पडल्याने इस्राएल आणि त्याचे 12 पुत्र इजिप्तला गेले आणि तिथे त्यांची भरभराट होऊन त्यांचे शक्तिशाली राष्ट्र बनले. इजिप्तच्या लोकांना या अंतर्गत शक्तिशाली इस्राएल राष्ट्राचा धोका वाटू लागला, म्हणून त्यांना बंदी बनवून त्यांचे जीवन खडतर गुलामगीरीत लोटले गेले. इजिप्त मध्ये 430 वर्षानंतर, मोझेसने त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढले आणि तांबडा समुद्र पार करून अरेबियाला नेले, सीनाय पर्वतावर त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र प्राप्त केले.
मोझेसबरोबर, इजिप्त सोडणाऱ्या इस्राएली लोकांच्या पिढ्यांचा, परमेश्वरावर विश्वास नसल्याने त्यांना समृद्ध प्रदेशात प्रवेश देण्यात आला नाही. त्याना 40 वर्षे भणंगपणे भटकावे लागले आणि नंतरच्या परमेश्वरावर विश्वास असलेल्या, नवीन पिढीने जोशुहा बरोबर समृद्ध प्रदेशात प्रवेश केला.
सुमारे 400 वर्षे, इस्राएलच्या 12 जमातींवर न्यायाधीशांचे राज्य मोझेसच्या नियमशास्त्राप्रमाणे चालले. त्यांनी जेव्हा इतर राष्ट्रांप्रमाणे स्वतःसाठी राजाची इच्छा केली तेव्हा, परमेश्वराने सौलची त्यांचा राजा म्हणून नियुक्ती केली, ज्याने 40 वर्षे राज्य केले, त्याच्या पश्चात राजा डेव्हिडने 40 वर्षे राज्य केले आणि डेव्हिडचा मुलगा सोलोमन याने 40 वर्षे राज्य केले. सोलोमनच्या राज्यकारभारा दरम्यान, इस्राएल राज्य त्याच्या सर्वात वैभवशाली शिखरावर होते, आणि पहिले मंदिर बांधले गेले, पण वृद्ध सोलोमनचे चित्त ईश्वरापासून दूर गेल्याने, परमेश्वराने त्याला सांगितले, की यापैकी 10 जमातींवर तुझ्या मुलाचे राज्य चालणार नाही.
सालोमनच्या मृत्यूनंतर इस्राएल राज्यात फूट पडली, आणि उत्तरेच्या 10 जमातींवर अनेक दुष्ट राजांनी राज्य केले, जे डेव्हिड आणि सोलोमंनचे वंशज नव्हते. या उत्तरी राज्याचे इस्राएल नाव कायम राहिले आणि अखेरीस त्याची राजधानी म्हणून सामारीया शहर मान्यता पावले. छोटे दक्षिणी राज्य, यहूदा म्हणून ओळखले जाऊ लागले, त्याची राजधानी यरुशलेम आणि डेव्हिडच्या वंशजानी त्यावर राज्य केले. 16 व्या राजे २ च्या प्रारंभी, दक्षिण राज्याचे लोक त्यांच्या राज्याच्या यहूदा या नावावरून "यहूदी" म्हणून ओळखले जाऊ लागले.
उत्तरी राज्य इस्राएलचा त्याच्या दुष्टपणामुळे असिरीयनानी निःपात केला आणि ते ताब्यात घेतले. राहिलेले इस्राएल लोक इतरात मिसळून गेले आणि इतर राष्ट्रांनी त्यांची भूमी बळकावली. हे लोक सामारानी म्हणून ओळखले जात, आणि उत्तरी इस्राएलच्या 10 जमातीचे पुन्हा कधीही एक राष्ट्र होऊ शकले नाही.
इतर दैवतांची पूजा करण्याबद्दल शिक्षा म्हणून अखेरीस दक्षीणी राज्य यहूदा हे बाबीलोनियानानी ताब्यात घेतले, आणि मंदिर नष्ट केले, पण 70 वर्षांनी, यहुदी यहूदाला परत आले, यरुशलेममध्ये मंदिर पुन्हा बांधले, आणि डेव्हिडच्या वंशजांनी त्यावर राज्य केले.
ख्रिस्ताच्या वेळी, यहूदाराष्ट्र यहूदीया म्हणून ओळखले जात असे आणि त्यावर रोमन शासन होते. येशू ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांनी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढ्यांचा शोध घेताना संपूर्ण याहुदिया प्रांतात सुवार्ता सांगितली. साडेतीन वर्षांच्या कारभारानंतर यहूदी लोकांनी येशूला त्यांचा मसीहा मानण्यास नकार दिला, आणि त्याला सुळावर चढवण्यासाठी रोमन राज्यपालाची खात्री पटवून दिली. मरणातून 3 दिवसानंतर येशू पुन्हा उठला आणि स्वर्गात पित्याच्या उजवीकडे प्रस्थान करण्यापूर्वी त्याने शिष्यांना जिवंत दर्शन दिले.
येशूला सुळावर चढवण्यापूर्वी असे संदेश सांगू लागले की त्याला नाकारण्याची शिक्षा म्हणून यरुशलेम जाळून टाकले जाईल, मंदिर नष्ट केले जाईल आणि यहूद्याना बंदीवान करुन राष्ट्रा राष्ट्रांत नेले जाईल. भविष्यात रोमन सम्राट टिटस याने सन 70 मध्ये यरुशलेमवर कब्जा केला तेव्हा हे भाकीत पूर्ण झाले. 1800 वर्षांपेक्षा अधिक काळ यहूदी लोक सर्व राष्ट्रांत विखुरलेल्या स्थितीत राहिले.
पुढे 1948 मध्ये, अशक्य ते शक्य झाले. इस्रायल राज्याची स्थापना केली गेली, आणि यहूदी लोकांना पुन्हा एकदा समृद्ध प्रदेश मिळाला. अनेक ख्रिस्ती लोकांना हा एक चमत्कार आणि परमेश्वराचा आशीर्वाद असल्यचे वाटले, पण खरोखरच हा परमेश्वराचा आशीर्वाद होता का, की हा अंधाऱ्या शक्तींचा प्रताप होता? उत्तर या चित्रपटात आहे.